'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अक्षरा आणि अभिमन्यू घराघरात पोहोचले आहेत. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते.
मालिकेत अक्षरा आणि अभिमन्यूची भू मिका अभिनेत्री प्रणाली राठोड आणि अभिनेता हर्षद चोपडाने साकारली आहे.
हर्षद आणि प्रणालीची ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चाहत्यांना फार पसंत आहे.
अनेकवेळा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत असतात. या दोघांना एकत्र पाहायला प्रेक्षकांना आवडतं.
दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत या दोघांच्या नात्याबाबत हर्षद चोपडाला प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देत अभिनेत्याने म्हटलं की, असं काहीच नाहीय. सध्या आम्ही सर्वजण आपापल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहोत'.
लवकरच मालिकेत अक्षरा आणि अभिमन्यू पुन्हा एकत्र येणार असल्याची हिंट हर्षदने चाहत्यांना दिली आहे.