मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराई संपण्याचं नावच घेत नाहीय. एकापाठोपाठ एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत.
दरम्यान आता 'ये है मोहब्बतें' फेम आलिया अर्थातच अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
तत्पूर्वी अभिनेत्री साखरपुडा उरकून घेणार आहे. मात्र यापूर्वीच अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीची प्रचंड चर्चा होत आहे.
येत्या सप्टेंबरमध्ये कृष्णा आपल्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा करणार आहे.तर 2023 मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.
कृष्णा मुखर्जीचा बॉयफ्रेंड कोणताही अभिनेता नसून एक मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे.
अभिनेत्री गेल्यावर्षी पहिल्यांदा त्याला भेटली होती. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांच्या भेटीचा योग आला होता.
अभिनेत्रीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
कृष्णा मुखर्जीने अनेक मालिकांमधून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.