आज सर्वत्र जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक लोक आपआपल्या पद्धतीने हेल्थ आणि फिटनेसबाबतीत जनजागृती करत आहेत. तर काही लोक आपला अनुभव शेअर करत आहेत.
आज मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेसुद्धा आपला अनुभव शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
सोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत . यामध्ये अभिनेत्रींचे दोन लुक पाहायला मिळत आहेत.
फोटोत एका बाजूला वेट लॉस करण्यापूर्वीचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला वेट लॉसनंतरचा फोटो आहे.
या फोटोंमध्ये इतकं मोठं ट्रान्सफॉर्मेशन दिसत की पाहणाऱ्यांनीसुद्धा तोंडात बोट घातलं आहे.
सोनालीने पोस्ट शेअर करत आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.
सोनाली कुलकर्णीने गेल्यावर्षी आपली वेट लॉस जर्नी सुरु केली होती.
या वर्षभरात सोनाली कुलकर्णीमध्ये इतका मोठा बदल झाला आहे की पाहून सर्वांनाच आनंद वाटत आहे.