यावर्षी देशात निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. पण 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या गावात निवडणूक आहे. त्या निवडणुकीला पाठकबाई आणि त्यांची खलनायिका वहिनी उभ्या राहतायत.
आता गंमत पहा, या पाठकबाईंना त्यांचा दीर पाठिंबा देतोय, तर वहिनीच्या बाजूनं उभं राहण्याचं राणानं ठरवलंय.
वहिनीनं राणाकडून तसा शब्दच घेतलाय. अर्थात, घरात राजकारण आणायचं नाही, असं पाठकबाई आणि राणानं ठरवलंय.
आता या निवडणुकीसाठी काही कागदपत्र लागणार आहेत आणि त्यात आहे लग्नाचं सर्टिफिकेट.
राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नाचा पुरावा. पण हा पुरावा गायब केला असतो वहिनीनं.
मग अशा वेळी अंजली पाठक राणाशी पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतात. त्यासाठी पाठकबाई राणाचं मन वळवणार आहात.
रविवारच्या महाएपिसोडमध्ये हे सर्व पाहता येईल. टीआरपीच्या युद्धात टिकून राहण्यासाठी अशा शकली लढवाव्या लागतात.
तुझ्यात जीव रंगला मालिका नेहमी टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाचात असते. आता मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत.