बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिचा शो 'मूविंग विथ मलायका'मुळे चर्चेत आहे.
या शोमधून मलाकाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा होत असलेला पहायला मिळतो.
अशातच मलायकाच्या आयुष्यातील आणखी एका गोष्टींचा खुलासा झाला आहे.
मलायका दुसऱ्या लग्नासाठी का तयार झाली याचं सत्य समोर आलं आहे.
मलायकाचा शो 'मूविंग विथ मलायका'मध्ये नुकतीच तिच्या बहिणीनं अमृता अरोरानं हजेरी लावली होती.
अमृता अरोरासोबत बोलताना अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला.
आगामी भागाच्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसतंय की, अमृताशी बोलताना मलायकाने सांगितले की, ती अर्जुनमुळे नाही तर तिची आई आणि कुटुंबामुळे दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली आहे.
मलायका म्हणते मी दुसरं लग्न केलं तर मला आमच्या कुटुंबाचं वंशावज बांगडया मिळतील.