बाॅलिवूडचा नेहमी आनंदी दिसणारा चेहरा म्हणजे अनिल कपूर. 60 वर्ष ओलांडलेला अनिल कपूर नेहमीच आनंदी दिसत असतो. त्यामागे आहे त्याचा फिटनेस फंडा. तो रोज जिममध्ये दोन ते तीन तास व्यायाम करतो.
सकाळी लवकर उठून अनिल कपूर जाॅगिंग आणि सायकलिंग करतो. सकाळच्या ताज्या हवेत नेहमीच आपण आनंदी राहतो असं अनिल कपूर सांगतो.
अनिल कपूर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पितो. नाश्त्याला तो अंडी, लेट्युस आणि कोबी यांचं सॅण्डविच खातो.
अनिल कपूरला स्ट्राॅबेरी मिल्कशेक आणि सफरचंदाचा ज्युस आवडतो.
डिनरला अनिल कपूरला विविध सॅलेड्स आणि ब्राऊन राईस आवडतं.
अनिल कपूर म्हणतो, मी सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक राहतो. कसलाच तणाव घेत नाही. दारू आणि सिगरेटला तो शिवतही नाही.