टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. टीव्ही सीरियलच्या सेटवरच तुनिषाने गळफास लावून आयुष्य संपवलं. यामुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
तुनिषा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तुनिषाचा सहकलाकार असलेला तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानला ताब्यात घेतलं आहे.
तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खान नक्की आहे तरी कोण याविषयी जाणून घेऊया.
शीझान खान एक अभिनेता आणि मॉडेल आहे.
शीझानने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
शीझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला.
शीझानने लहान वयातच अभिनय विश्वात एंट्री घेतली. 'जोधा अकबर' या शोमध्ये शीझानने अकबरच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
सध्या तो तुनिषा शर्मासोबत 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या टीव्ही मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत होता. दोघांमध्ये खास बॉन्डिंग असून ते एकमेकांसोबत फोटो शेअर करायचे.