सध्या कियारा अडवाणीची डुब्लिकेट म्हणून चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे तनीषा संतोषी.
कियाराची डुब्लिकेट आणि जान्हवी कपूर, खुशी कपूरची बेस्टफ्रेंड तनीषा संतोषी नक्की कोण आहे? तिच्याविषयी जाणून घेऊया.
बॉलिवूड डायरेक्टर राजकुमार संतोषीची लाडकी मुलगी तनीषा संतोषी लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटातून तनीषा बॉलिवूड डेब्यू करत आहे.
तनीषाचा चित्रपटातील पहिला लुक समोर आला असून ती हुबेहुब कियारासारखी दिसत असल्याची चर्चा रंगली आहे.
'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटातून राजकुमार संतोषी आठ वर्षानंतर डायरेक्टर म्हणून पुनरागमन करणार आहे.
गांधी गोडसे चित्रपटातील तनीषाची भूमिका छोटी आहे.
तनीषा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. निरनिराळे फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.