अभिनेत्री मौनी राॅयचा छोटा पडदा ते मोठा पडदा हा प्रवास खूपच जलद झाला. आपल्या फिटनेससाठी लोकप्रिय असलेली मौनी रोज अर्धा तास कथ्थक करते. त्यामुळे तिचं शरीर लवचिक राहतं.
मौनी जिममध्येही वर्कआऊट करते. पण भूमिकेची जशी गरज तसा ती व्यायाम करते.
मौनीची त्वचा एकदम मुलायम आहे. याचं कारण ती भरपूर पाणी पिते. पाण्यामुळे तुमची त्वचा तजेलदार राहते.
मौनी फळं आणि भाज्या भरपूर खाते.
मौनीला रेस्टाॅरंटमध्ये खाणं आवडतं. ती चायनीज फूड जास्त खाते.
शिवाय मौनी दारू अजिबात पित नाही. तेलकट पदार्थ तिला वर्ज्य आहेत.