बाहुबली ही भारतीय सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय फ्रेंचाईजीपैकी एक म्हणून ओळखली जाते.
या चित्रपट मालिकेचे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता बाहुबली बिफोर द बिगनिंग ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
बाहुबलीमध्ये अभिनेता प्रभाससोबतच अभिनेत्री राम्या क्रिष्णा यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी या चित्रपटात शिवगामी अर्थात बाहुबलीच्या आईची भूमिका साकारली होती.
ही भूमिका साकारताना त्यांनी पकडलेलं बेअरिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. अक्षरश: जीव ओतून त्यांनी शिवगामीची भूमिका साकारली.
परंतु बाहुबली बिफोर द बिगनिंगमध्ये मात्र त्यांनी काम करण्यास नकार दिला. परिणामी या भूमिकेसाठी निर्मात्यांनी वामिका गाबी हिची निवड केली आहे.
वामिका देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. ती आपल्या युनिक टाईमिंगसाठी ओळखली जाते.
तिनं आतापर्यंत लव्ह आज कल, जब वी मेट, गोधा, नाईन, मासुम यांसारख्या काही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
ग्रहण या वेब सीरिजमुळे ती खऱ्या आर्थाने प्रकाशझोतात आली होती.
वामिकानं आतापर्यंत सहाय्यक अभिनेत्रीपासून खलनायिकेपर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु ती बाहुबलीच्या आईची भूमिका कशी साकारेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
बाहुबली बिफोर द बिगनिंग ही एक बिग बजेट सीरिज आहे. जवळपास 200 कोटींचं बजेट यासाठी जाहिर करण्यात आलं आहे.