बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या कामापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असतो.
विवेक ओबेरॉयने अलिकडेच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यात आलेल्या वाईट वेळेविषयी सांगितलं.
विवेकनं सांगितलं की, त्याच्या आयुष्यात असाही काळ आला होता की दिड वर्षे त्याच्याकडे काहीच काम नव्हते. तो पूर्णपणे रिकामा होता.
विवेकनं सांगितलं की, तो अनेक ऑडिशनसाठी जात होता मात्र त्याला काम मिळत नव्हते.
विवेकच्या आयुष्यात असाही काळ आला होता जेव्हा त्याला आत्महत्या करु वाटली होती.
माझ्यामध्ये नकारत्मकता एवढी वाढली होती की, मला काय करावे कळत नव्हते. मला डिप्रेशनमुळे आत्महत्या करण्याचाही विचार येऊन गेला, असं विवेकनं सांगितलं.
त्यानंतर माझ्या आयुष्यात प्रियांका आली आणि सगळंच बदलून गेल्याचं विवेकनं सांगितलं.
विवेक पुढे म्हणाला, या सगळ्यामुळे सुशांत सिंह राजपूतला कोणत्या वेदना झाल्या असतील हे मी समजू शकतो.