गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची वारंवार मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर 'बॉयकॉट बॉलिवूड' हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
परंतु विजय देवरकोंडाच्या 'लायगर'मुळे चित्रपटगृहातील प्रेक्षकांचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा केली जात होती. दरम्यान विजयनेसुद्धा 'बॉयकॉट बॉलिवूड' वर प्रतिक्रिया देत प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला आहे.
दरम्यान Gaiety Galaxy आणि मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाईंनी विजयवर सडकून टीका केलीय. इतकंच नव्हे तर त्यांनी अभिनेत्याला गर्विष्ठ म्हटलं आहे.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, 'आमच्या चित्रपटांवर बहिष्कार टाका, म्हणत तुम्ही का उगाच स्मार्टनेस दाखवत आहात? लोक OTT वरही बघणार नाहीत.
तुमच्या अशा वागण्याने आम्हीसुद्धा अडचणीत आलो आहोत. चित्रपटांच्या ऍडव्हान्स बुकिंगवरदेखील मोठा परिणाम झाला आहे.
मिस्टर तुम्ही 'कोंडा' नाही तर 'अॅनाकोंडा' आहात. आणि तुम्ही आता अॅनाकोंडासारखं बोलत आहात.
'विनाशकाली विपरीत बुद्धी', विनाश जवळ आल्यावर बुद्धी काम करणं बंद करते, तुम्ही अगदी तसंच करत आहात. असुदे तुमची इच्छा'.
अशा खरमरीत शब्दांत मनोज यांनी विजयवर टीका केली आहे.