दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर आणि पुरी जगन्नाध दिग्दर्शित 'लाइगर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'लाइगर' चित्रपटासाठी विजय देवरकोंडानं खास बॉडी बनवली आहे. विजय बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार असून त्याअनुशंगानं त्यानं आपली शरिरयष्टी बनवलेली पोस्टमधून पहायला मिळत आहे. मात्र ही बॉडी बनवण्यासाठी विजयला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये, विजयचे फिटनेस प्रशिक्षक कुलदीप सेठी यांनी 'लाइगर'साठी विजयचला बॉडी बनवायला किती मेहनत घेतली याविषयी सांगितलं आहे. कुलदीपनं सांगितलं की, विजयला बक्सरचं शरीर बनवायला आणि माईक टायसनसोबतच्या लढाईच्या सीक्वेन्समध्ये त्याच्या बरोबरीनं दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आणि विजय त्याच्या वर्कआऊटविषयी प्रामाणिकही होता.
'डिसेंबर 2019 मध्ये, विजयने पुरी सरांसोबत लाइगरसाठी काम सुरु केलं. यूएफसी फायटर असल्यामुळे त्याचे शरीर एका विशिष्ट पद्धतीने दिसले पाहिजे, असं मला सांगण्यात आलं होतं. जर लॉकडाऊनचा कालावधी आणि या प्रशिक्षणातील चढ-उतार एकत्र केले तर आम्ही दोन वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या शरीरावर एकत्र काम केले आहे, अन्यथा चित्रपटासाठी त्याची शरीरयष्टी साध्य करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी सुमारे सहा महिने लागले असते', असंही कुलदीपने सांगितले.
फायटरचे शरीर बॉडीबिल्डरपेक्षा खूप वेगळे असते, तो अॅथलीटसारखा असतो. यूएफसी लढवय्ये दुबळे असतात, वजनदार नसतात, आम्हाला त्याचे शरीर त्याच्या वजनाच्या श्रेणीनुसार आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार कोरावे लागले, कारण त्याला अधिक ऍथलेटिक असणे आवश्यक होते. आम्ही एकत्र काम करू लागल्यानंतर लॉकडाऊन लागलं. आम्ही त्याच्या घरी कसरत करायचो.
कुलदीप म्हणाला, विजयने माईक टायसनसोबत फाईट सीन केले आहेत, जो एक लीजेंड आहे. आम्ही शूटिंग करत असताना तो खूप चांगली कामगिरी करत होता. पुरी सरांनी अशा प्रकारे फाईट सीक्वेन्सची योजना आखली की विजयला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करण्यासाठी आम्हाला बराच वेळ मिळाला.
रुपेरी पडद्यावर दिसणारे परिवर्तन हे एका रात्रीत काम नाही. आम्हा दोघांची खूप मेहनत आहे. तुम्ही हे सगळं एकत्र पाहता तेव्हा तुम्ही केलेल्या कष्टाचे परिणाम अगदी योग्य आणि विलक्षण असलेले पहायला मिळतात, असं कुलदीपने सांगितलं.
एक सेलिब्रिटी म्हणून तो अर्थातच मोठा स्टार आहे मात्र विजयसोबत नेहमीच मजा येते, कारण तो एक चांगला विद्यार्थी आहे, असंही कुलदीपनं सांगितलं.