बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सतत कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टसमध्ये व्यग्र असतो.
सोबतच विकी कौशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.
नुकतंच विकी कौशलने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर करत एका आठवणीबाबत सांगितलं आहे.
विकीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो दिग्दर्शिका मेघना गुलझारसोबत एका घराच्या टेरेसवर बसलेला दिसून येत आहे.
अभिनेत्याने हा फोटो शेअर करत आपली ६ वर्षांपूर्वीची एक आठवण सांगितली आहे.
यामध्ये विकीने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी याच छतावर आम्ही 'राजी'चं शूटिंग करत होतो. यावेळी मला मेघना यांनी आपल्या आगामी 'सॅम बहाद्दूर' या प्रोजेक्टबाबत सांगितलं होतं.
त्या मला सांगत असताना मी मनात एक प्रार्थना केली होती की, या भूमिकेसाठी माझा विचार करण्यात यावा'.
आणि आज सहा वर्षानंतर त्याच ठिकाणी आम्ही सॅम बहाद्दूर'चं शूटिंग करत आहोत. आज माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. मला हे सर्व जादुई वाटत असल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.