अभिनेता रितेश देशमुख सध्या आपल्या 'वेड' या मराठी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्ह स्टोरीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये खेचण्यात यशस्वी ठरत आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलियाने तब्बल 10 वर्षांनंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे अभिनेत्रीने मराठीतून दमदार पदार्पण केलं आहे.
वेड चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रितेश आणि जिनिलियाने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या काही खाजगी गोष्टींचादेखील खुलासा केला आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने मुंबई मिररला एक मुलाखत दिली होती. यामध्ये अभिनेत्याने त्या गोष्टीचा खुलासा केला होता ज्याची महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता होती.
रितेश देशमुखचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धीरज देशमुख दोघेही राजकारणात कार्यरत आहेत. परंतु रितेश देशमुख मात्र त्यांच्यापासून अतिशय वेगळ्या क्षेत्रात आहे. असं का?
याच उत्तर देताना रितेश देशमुखने सांगितलं होतं, 'मी प्रत्येक व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करतो. परंतु मी माझे सर्व निर्णय मी स्वतः घेतो. मी आयुष्यभर सत्ता काय असते पाहिली आहे.
त्यामुळे मी माझ्या सिने कारकिर्दीतच आनंदी आहे. मी राजकरण माझ्या भावंडावर सोडलं आहे. त्यामुळे मी चित्रपटांमध्ये आनंदाने कार्यरत आहे.