NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Valentines Day 2023: मुंबईच्या ब्रिजवर भर गर्दीत बसून मराठमोळ्या अंकुशने दीपाला केललं प्रपोज; या दोघांची LOVE STORY तुम्हालाही पाडेल प्रेमात

Valentines Day 2023: मुंबईच्या ब्रिजवर भर गर्दीत बसून मराठमोळ्या अंकुशने दीपाला केललं प्रपोज; या दोघांची LOVE STORY तुम्हालाही पाडेल प्रेमात

Valentines Day 2023: आज जगभरात व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जात आहे. सर्वत्र प्रेमाचं वारं वाहताना दिसून येत आहे. दरम्यान अनेकांना आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आज आपण अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेणार आहोत.

18

आज जगभरात व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला जात आहे. सर्वत्र प्रेमाचं वारं वाहताना दिसून येत आहे. दरम्यान अनेकांना आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या लव्हस्टोरीबाबत जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आज आपण अभिनेता अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या लव्ह स्टोरीबाबत जाणून घेणार आहोत.

28

मराठमोळे सेलिब्रेटी कपल अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या लग्नाला आता १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आजही या दोघांची लव्ह स्टोरी ऐकायला त्यांच्या चाहत्यांना आवडते.

38

अंकुश चौधरी आणि दीपा परब यांची पहिली भेट महर्षी दयानंद कॉलेजमध्ये झाली होती. कारण ते दोघे याच कॉलेजमध्ये शिकत होते.

48

कॉलेजमध्ये शिकत असतानां अंकुश आणि दीपामध्ये फारच छान मैत्री झाली होती.हळूहळू हे दोघेही एकमेकांवर प्रेम करु लागले होते.

58

परंतु दोघांनीही आपल्या भावना एकमेकांना बोलून दाखविल्या नव्हत्या. दरम्यान अंकुशने पुढाकार घेत आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला होता.

68

अंकुशने अगदी फिल्मी स्टाईलने दीपाला प्रपोज करण्याचा प्लॅन बनवला होता. त्यांचं कॉलेज लोअर परेल ब्रिजपासून अगदी काहीच अंतरावर असल्याने अभिनेत्याने तीच जागा निवडली होती.

78

एके दिवशी दीपा कॉलजमधून चालत घरी जात असताना अंकुशने तिचा पाठपुरावा घेत लोअर परेल ब्रिज गाठलं. आणि दीपा ब्रिजवर आल्यांनतर चक्क गर्दीत आपल्या गुडघ्यावर बसून दीपाला प्रपोज केलं.

88

दीपानेसुद्धा लगेचच अभिनेत्याला होकार देत तिचं प्रपोजल मान्य केलं. आणि पुढे २००७ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

  • FIRST PUBLISHED :