मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिची वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधान यांच्याशी असलेली मैत्री सर्वांच्यापरिचयाची आहेच हे तिघंही अनेकदा एकमेकांसोबत फोटो शेअर करताना दिसतात.
सध्या मात्र पूजा आणि भूषण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आले आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे या दोघांमध्ये मैत्री आहे की प्रेम अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे आणि अशातच पूजा-भूषण यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर रोमॅन्टीक फोटो शेअर केले आहेत.
हे दोघं सध्या रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे डे साजरे करताना दिसत आहेत. त्यासोबतच या दोघांनीही या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचा गोंधळ उडाला आहे.
पूजा आणि भूषणमध्ये खरंच असं काही खास नातं आहे की हा कोणत्या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे असा संभ्रम सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झालेला दिसत आहे.
पूजा आणि भूषण यांचे हे फोटोशुट चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे याचा खुलासा येत्या काळात होईल.