'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमातून आपल्या सिनेम करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे केले नसले तरी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ती या ठिकाणी आपलं स्थान पक्क करण्यात यशस्वी ठरली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सध्या WAR सिनेमातील बिकिनी अवतारामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री वाणी कपूर आहे.
वाणीचे वडील शिव कपूर यांचा दिल्लीमध्ये फर्निचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे. याशिवाय ते एक एनजीओ सुद्धा चालवतात. वाणीचं अभिनय क्षेत्रात करिअर करणं त्यांना मान्य नव्हतं.
वाणीची आई डिम्पी कपूर एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. पण सध्या ती मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम पाहते. तर वाणीची मोठी बहीण नुपूर लग्न करुन हॉलंडला स्थायिक झाली आहे.
वाणीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मुलींनी लवकर लग्न करुन संसाराला लागावं असं तिच्या वडीलांचं मत होतं. तिच्या बहीणीचं लग्न वयाच्या 18 व्या वर्षी झालं होतं. मात्र वाणीला असं करायचं नव्हतं.
वाणी अभिनय क्षेत्रात येण्यामागे तिच्या आईचं मोठं योगदान आहे. कारण तिचे वडील तिच्या मॉडेलिंग करिअरच्या विरोधात होते. मात्र तिच्या आईनं तिला यामध्ये पाठिंबा दिला.
वाणीनं दिल्लीच्या इंदिरा गांधी नेशनल ओपन यूनिवर्सिटी (IGNOU)मधून टुरिझमच्या अभ्यासक्रमाची डिग्री घेतली आहे.
कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाणीनं जयपुरच्या ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्टमध्ये काही काळ इंटर्नशिप केली आणि त्यानंतर काही महिने आयटीसी हॉटेल्समध्ये कामही केलं.
हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असतानाच वाणीनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही काळानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत वाणीनं बॉलिवूडमध्ये फक्त 3 सिनेमांमध्ये काम केलं आहे मात्र त्यातही तिचं करिअर यशस्वी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. याशिवाय तिनं काही तमिळ सिनेमातही काम केलं आहे.