बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या सौंदर्य आणि फॅशनमुळे सतत चर्चेत असते. तिच्या सौंदर्यावर जो-तो घायाळ होतो.
अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिचं खाजगी आयुष्यसुद्धा प्रचंड रंजक आहे.
चाहत्यांना सतत तिच्या खाजगी आयुष्याबाबत आणि रिलेशनशिपबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते.
नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्याबाबत असा एक खुलासा केला की ज्यामुळे सर्वच चकित झाले आहेत.
या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने आपल्याला आलेल्या एका विचित्र लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं आहे.
यावेळी अभिनेत्रीने सांगितलं की तिला एका इजिप्शियन गायकाने लग्नाची मागणी घातली होती. परंतु सांस्कृतिक फरकामुळे मी त्यांना नकार दिला.
महत्वाचं म्हणजे आधीच त्या गायकाच्या दोन पत्नी आणि चार मुले होती. अभिनेत्री त्या गायकाच्या नावाचा खुलासा केलेला नाहीय.
मात्र सोशल मीडियावर चाहते हा इजिप्शियन गायक मोहम्मद रमदान असल्याचं म्हणत आहेत. कारण या दोघांनी गेल्यावर्षी 'वर्साचे बेबी' या इंटरनॅशनल अल्बममध्ये एकत्र काम केलं होतं.