टीआरपी रेटिंगमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी तीनवरून आता नंबर पाचवर घसरलीय. शिवाजी-संभाजी भेटीचे एपिसोड कमालीचे हिट झाले होते. गेल्या आठवड्यात मात्र या मालिकेचा नंबर खाली आलाय.
'तुझ्यात जीव रंगला' मालिका नंबर चारवर होती. ती त्याच स्थानावर कायम राहिलीय. मालिकेतलं दिवाळी सेलिब्रेशन चांगलंच रंगलं होतं.
गेल्या वेळी नंबर वनवर असलेली 'तुला पाहते रे' मालिका यावेळी नंबर तीनवर गेलीय. मालिकेत विक्रांत सरंजामे लंडनला गेलाय. सुबोध सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्यानं मालिकेचा टीआरपी घसरला एवढं नक्की. लोकांना मायराच्या कटकारस्थानांपेक्षा विक्रांत-ईशाची केमिस्ट्री पाहायला आवडते असं वाटतंय.
गेल्या वेळी नंबर दोनवर असलेली 'माझ्या नवऱ्याची बायको' आताही त्याच स्थानावर आहे. गेले दोन आठवडे या मालिकेला नंबर वनपासून मुकावं लागलंय. लोकांना राधिका आणि शनाया एकत्र येणं फारसं रुचलेलं नसावं.
टीआरपी रेटिंगमध्ये नेहमीप्रमाणे पहिल्या पाचात झी मराठीच्याच मालिका आहेत. दुसऱ्या वाहिनींच्या मालिकांना अजून स्थान मिळत नाहीय. अगदी स्टार प्रवाहवरचा दिन दिन दिवाळीही या पाचात आला नाहीय.
सर्व मालिकांना ढकलून नंबर वन ठरलाय नात्यांचा उत्सव. दिवाळीत उत्सव नात्यांचा म्हणजेच झी अॅवाॅर्ड सोहळा वरचढ ठरलाय. या सोहळ्यात प्रेक्षकांचे सर्वच आवडते कलाकार होते. त्यामुळे हा शो नंबर वन ठरलाय.