गेल्या आठवड्यात स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत बऱ्याच भावनिक घटना घडल्या. रायगडावर बाळराजे राजाराम यांचं लग्न लागलं. पण त्या लग्नाला संभाजी महाराज काही पोचू शकले नाहीत. अशा अनेक घटना घडूनही ही मालिका पाचव्या स्थानावर आलीय. गेल्या वेळी मालिका चवथ्या नंबरवर होती.
गेल्या वेळी अख्खा आठवडा नागराज मंजुळे स्पेशल होता. चला हवा येऊ द्यामध्ये नाळ आणि सैराट दोन्ही टीम आठवडाभर होत्या. याचा परिणाम मालिका चवथ्या नंबरवर आली. प्रेक्षकांनी एपिसोड्स एंजाॅय केले. याचा फायदा नाळ सिनेमालाही झाला.
टीआरपी रेटिंग दर आठवड्याला येतं. याही वेळी झी मराठीच्याच मालिका पहिल्या पाचमध्ये आहेत.इतर वाहिन्यांवरच्या मालिका खूप वळणं आणूनही वर येत नाहीयत.
तुझ्यात जीव रंगलानं मात्र आपलं स्थान अबाधित ठेवलंय. गेल्या वेळीही मालिका नंबर तीनवर होती. याही वेळी ती तीनवरच आहे. म्हणजे मालिकेचा जो प्रेक्षकवर्ग आहे, तोच कायम राहिलाय.
'तुला पाहते रे' मालिका गेल्या वेळेप्रमाणे नंबर दोनवरच आहे. सध्या या मालिकेत एखाद्या सिनेमाप्रमाणे घटना घडतायत. विक्रांतचा जीव धोक्यात आहे.
आणि अवाॅर्ड गोज टु पुन्हा एकदा 'माझ्या नवऱ्याची बायको'ला. राधिका-शनाया यांची एकजूट, गुरूला कळलेलं सत्य अशा बऱ्याच घटनांनी मालिका सुरू आहे. प्रेक्षकही ती आवर्जून बघतोय. अनेकांना या मालिका तणाव दूर करण्याचं साधन वाटतात. म्हणजे आयुष्यातला तणाव दूर करण्यासाठी मालिकांमधला तणाव पाहायचा.