टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद नेहमीच आपल्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते.
उर्फी कधी कोणत्या वस्तूपासून ड्रेस डिझाईन करुन परिधान करेल याचा नेम नसतो.
उर्फी सतत सोशल मीडियावर आपल्या हटके लूकमधील फोटो शेअर करत असते.
परंतु अनेकवेळा या फॅशनमुळे उर्फीला त्रास सहन करावा लागतो.
आजही असंच काहीसं झालं आहे. नुकतंच उर्फीने एक फोटो शेअर करत याबाबत सांगितलं आहे.
उर्फीने नुकतंच वायरपासून बनलेला एक ड्रेस परिधान केला होता. परंतु या ड्रेसमुळे उर्फीच्या त्वचेला प्रचंड इजा झाली आहे.
उर्फीने फोटो शेअर करत म्हटलंय, 'माझ्या त्वचेला भरपूर इजा झालीय. मात्र ठीक आहे. सुंदर दिसण्यासाठी इतकी किंमत मोजावीच लागते.