उर्फी जावेद हे नाव सतत सोशल मीडियावर चर्चेत असतं. उर्फी आपल्या तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलदेखील होत असते.
उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजपर्यंत उर्फीने नको ना नको त्या गोष्टींपासून बनवलेले ड्रेस परिधान करत सर्वांनाच थक्क केलं आहे.
अनेकांना प्रश्न पडतो उर्फी जावेद कोणतीही मालिका किंवा चित्रपट न करता इतका पैसा कुठून आणते?त्यामुळेच आज आपण तिच्या नेटवर्थबाबत जाणून घेणार आहोत.
उर्फी जावेद आपल्या हटके अंदाजामुळे इतकी चर्चेत आली आहे की, इन्स्टाग्रामवर तिला तब्बल 4.1 मिलियन लोक फॉलो करतात.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करते. शिवाय ती सोशल मीडियावरील जाहिरातींमधूनही पैसा कमावते. उर्फी रिऍलिटी शोमध्येसुद्धा दिसून येते. याआधी उर्फीने काही मालिकांमध्येसुद्धा काम केलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी महिन्याला बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षासुद्धा जास्त कमाई करते. उर्गी महिन्याला 2 कोटींची कमाई करते.
तुम्हाला वाचून धक्का बसेल उर्फी जावेदची एकूण संपत्ती 172 कोटी इतकी असल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येतं.