आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण कायम चर्चेत असतात. आजही त्यांची सदाबहार गाणी प्रेक्षक आवर्जुन ऐकतात.
आज उदित नारायण यांचा वाढदिवस आहे. ते आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. उदित नारायण यांच्या वाढदिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
उदित नारायण त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असतात. त्यांनी दोन लग्न केली आहेत.
उदित यांचं पहिलं लग्न रंजना झा आणि दुसरे लग्न दीपा गहतराज यांच्यासोबत झाले होते.
रंजना झा यांनी त्याच्यावर फसवणूक केल्याचा आणि घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते वादात सापडले होते.
सुरुवातीला उदित नारायणने रंजनाशी लग्न केल्याची बाब नाकारली, पण रंजनाने कोर्टात धाव घेतली तेव्हा उदितने ही गोष्ट मान्य केली. यानंतर न्यायालयाने उदितला दोन्ही पत्नींसोबत राहण्यास सांगितले.
दीपा गहतराज सुद्धा स्वतः एक गायिका आहे
दीपा गहतराज आणि उदितला आदित्य नारायण नावाचा मुलगा देखील आहे जो स्वतः एक चांगला गायक देखील आहे.
'पापा कहते हैं बडा नाम करेंगे' या गाण्यामुळे उदित नारायण यांना खरी ओळख मिळाली.