NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 23 हजार हिरे, 887 ग्रॅम सोनं; पाहा जगप्रसिद्ध गायकाचं कोट्यवधींचं लॉकेट

23 हजार हिरे, 887 ग्रॅम सोनं; पाहा जगप्रसिद्ध गायकाचं कोट्यवधींचं लॉकेट

सक्सेस साजरं करण्यासाठी गायकानं लढवली शक्कल; 23 हजार हिऱ्यांचं केलं लॉकेट

110

टायलर द क्रिएटर (Tyler the Creator) हा पाश्चात्य संगीतसृष्टीतील सध्याच्या आघाडिच्या रॅपर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

210

‘बास्टर्ड’ या गाण्यातून प्रकाशझोतात आलेल्या टायलरचा ‘कॉल मी इफ यु गेट लॉस्ट’ (Call Me If You Get Lost) हा म्युझिक अल्बम नुकताच प्रदर्शित झाला.

310

या अल्बमला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय यामुळे त्याला कोट्यवधींचा नफा देखील झाला.

410

परिणामी आपलं यश साजरं करण्यासाठी त्यानं तब्बल चार कोटी रुपयांचं एक डायमंड लॉकेट खरेदी केलं आहे.

510

जगप्रसिद्ध सेलिब्रिटी ज्वेलर एलेक्स मॉस याने या खास लॉकेटच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली होती.

610

जवळपास गेले सात महिने तो या लॉकेटच्या डिझाईनवर काम करत होता.

710

सोनं आणि हिऱ्यांपासून या लॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे. टायलरनं स्वत:ची प्रतिकृती या लॉकेटमध्ये बनवण्यास सांगितली होती. त्याप्रमाणे एक लहानसा हिऱ्यांनी मढवलेला स्टॅच्यु मॉसने तयार केला आहे.

810

या विशेष लॉकेटची किंमत तब्बल चार कोटी रुपये इतकी आहे. शिवाय मेकिंगसाठी आणखी 75 लाख रुपये डिझायनरला द्यावे लागले.

910

टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार यामध्ये त्याने तब्बल 23 हजार 515 स्टोन लावले आहेत.

1010

टायलरने या महागड्या लॉकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे लॉकेट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :