टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच ती सतत चर्चेत असते. तिचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिच्या अफेयर्सच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी पलक तिवारी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत एका रेस्टोरंटमध्ये दिसून आली होती.
त्यांनतर त्यांच्या अफेयर्सच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. हे दोन्ही स्टारकिड्स एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.
मात्र आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार, पलक तिवारी इब्राहिमला नव्हे तर वेदांग रायनाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
वेदांग हा सुहाना खान, ख़ुशी कपूर, अगत्स्या नंदासोबत 'द आर्चिज' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
वेदांग आणि पलक एकाच प्रॉडक्शन हाऊसचे कलाकार असून या प्रॉडक्शन हाऊसच्या एका पार्टीमध्ये त्यांची ओळख झाल्याचं म्हटलं जात आहे
या दोघांनी अजूनही कोणतीच अधिकृत नसली तरी सोशल मीडियावर मात्र या दोघांची चर्चा रंगली आहे.