Home » Photo Gallery » entertainment
News18 Lokmat | January 03, 2020, 14:31 IST

TRP Meter : वर्षाच्या शेवटी 'सासूबाई' पडली 'बायको'वर भारी!

मराठी टेलिव्हिजनचं या आठवड्याचं टीआरपी रेटिंग समोर आलं आहे. पाहा तुमच्या आवडती मालिका टॉप 5मध्ये कोणत्या स्थानावर आहे.

1/ 8

2/ 8

झी टिव्ही वरील ऐतिहासिक मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या आठवड्याच्या टीआरपी मिटरमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

3/ 8

या आठवड्याच्या TRP लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर झी मराठीची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. सध्या या मालिकेत नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत.

4/ 8

काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको'नं टीआरपी लिस्टमध्ये तिसरऱ्या स्थानावर घसरली आहे. या मालिकेत आता मारिया आणि मदनचं लग्न होताना पाहायल मिळणार आहे.

5/ 8

वेगवेगळ्या ट्वीस्ट आणि टर्न्ससोबत वर्षाच्या शेवटी अग्गंबाई सासूबाई या मालिकेनं बाजी मारली. ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

6/ 8

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको पहिल्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सौमित्र आणि राधिकाचं लग्नानंतरचा गोड संसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दिली आहे.

7/ 8

मागच्या दोन आठवड्यांप्रमाणेच या आठवड्यातही टीआरपी लिस्टमध्ये पुन्हा झी मराठीच्या मालिकांनी बाजी मारली आहे. टॉप 5 मध्ये सर्व मालिका या झी मराठीच्या आहेत.

8/ 8

मागच्या आठवड्यात मिसेस मुख्यमंत्री या मालिकेनं टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं होतं. मागच्या आठवड्यात ही मालिका पाचव्या स्थानावर होती. मात्र या आठवड्यात ही मालिका पुन्हा टॉप 5 मधून बाहेर पडली आहे.

Published by:Megha Jethe
First published:January 03, 2020, 14:31 IST