मराठी मालिका दिवसेंदिवस आणखीनच लोकप्रिय होत चाललेल्या पहायला मिळत आहे. या आठवड्यात कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचं सर्वात जास्त मनोरंजन करून पहिल्या स्थानावर बाजी मारली हे आपण जाणून घेऊया. टिआरपीच्या रेसमध्ये 10 नंबरवर आहे स्टारप्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका.
टीआरपीच्या रेसमध्ये 9 नंबरवर आहे झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका.
'स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा' ही मालिका आठव्या स्थानावर आली आहे.
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका गेल्या काही आठवड्यांप्रमाणे आजही सातव्या क्रमांकावरच आहे.
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे.
टिआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाह वाहनिवरील 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका 5.8 टीआरपीसह पाचव्या स्थानावर आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर आली आहे. या आठवड्यात या मालिकेला 6.1 रेटिंग दिलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेनं या आठवड्यात तिसरा क्रमांक गाठला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका trp रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
Trp रेसमध्ये या आठवड्यात 6.7 रेटिंगसह 1 नंबरवर स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेनं बाजी मारली आहे.