नुकतंच 'टूथपरी' या वेबसीरीजचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमधील अभिनेत्रीचंही प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.
यामध्ये अभिनेत्री तान्या मानिकतला झळकणार आहे. तान्या याआधी ईशान खट्टरच्या 'ए सुटेबल बॉय'मध्ये झळकली होती.
परंतु त्यावेळी अभिनेत्रीच्या एका सीनमुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता.
यामध्ये अभिनेत्री एका दुसऱ्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडते असं दाखवण्यात आलं होतं.
शिवाय ती त्याला मंदिराच्या आवारात किस करतानाही दाखवण्यात आलं होतं.
या सीनमुळे अनेक लोक संतापले होते. अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त करत निषेध केला होता.
यादरम्यान तान्या प्रचंड तणावात आली होती. पण तत्पूर्वीच तिने अभिनय क्षेत्र सोडण्याचा विचार केला होता.
कारण अभिनेत्रीच्या मते ती ऑडिशन देऊन आणि रिजेक्शन पाहून कंटाळली होती. दरम्यान ती विदेशला निघाली असता तिला ही ऑफर मिळाली होती.
या सीरिजमधून तिला ओळख तर मिळाली पण सोबतच टीकेलासुद्धा सामोरं जावं लागलं होतं.