बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री रेखा वयाच्या 68 व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. आज 10 ऑक्टोबर रोजी रेखा आपला वाढदिवस साजरा करत आहे.
चेन्नईमधे जन्मलेल्या रेखाचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन आहे पण फिल्मी दुनियेत तिला रेखा या नावाने ओळखले जाते.
रेखाचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ अभिनेते आणि आई पुष्पवल्ली तेलगू अभिनेत्री होत्या. यामुळेच रेखालाही लहानपणापासूनच या जगाचे आकर्षण होते. रेखानं वयाच्या 15व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली.
रेखा आपल्या खाजगी आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. आजतागायत रेखा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.
रेखाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच रहस्यमय आहे. असे म्हटले जाते की, ती तिचा सहकारी कलाकार विनोद मेहरा यांच्या प्रेमात पडली होती. दोघांचे लग्नही झाले होते पण विनोदच्या आईला हे नाते मान्य नव्हते.
रेखाचे अमिताभ यांच्यासोबतही नाव जोडले गेले. आजही रेखाचं नाव आलं की अमिताभ यांचंही नाव येतंच. दोघांची प्रेमकहाणी आजही चर्चेत असते.
1980 मध्ये रेखा पांढरी साडी, बिंदी आणि सिंदूर परिधान करून ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्या रिसेप्शनला पोहोचली होती. अमिताभ आणि जयाही इथे होते. रेखा थेट अमिताभ यांच्याकडे गेली, थोडा वेळ बोलून निघून गेली. हे बघून जया तिथे रडायला आली होती. अमिताभ आणि जया यांच्यात काय झाले हे आजही कुणाला माहीत नाही.
प्रेमाच्या बाबतीत अमिताभशिवाय रेखाचे नाव विश्वजीत, जितेंद्र, नवीन निश्चल, साजिद खान, शत्रुघ्न सिन्हा आणि अक्षय कुमार यांच्यासोबतही जोडले गेले आहे.