सध्या सर्वत्र होळी-रंगपंचमीची धूम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून कलाकार रंगांमध्ये न्हाऊन निघत आहेत सणाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. मात्रमनोरंजनसृष्टीत काही कलाकार असे सुद्धा आहेत ज्यांना रंगाची भीती वाटते. वाटलं ना आश्चर्य? हे खरं आहे. पाहूया या यादीत कोणकोणत्या कलाकारांचा समावेश होतो.
बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर खान सर्व सण मोठ्या थाटामाटात साजरे करत असली तरी तिला होळीत रंग खेळायला अजिबात आवडत नाही.
बॉलिवूडमधील हॅन्ड्सम हंक अभिनेता म्हणजेच जॉन अब्राहमलाही होळीच्या सणात रंगामध्ये न्हाऊन निघायला अजिबात आवडत नाही.
अभिनेत्री क्रिती सेननला आपापल्या घरची होळी फार आठवते. या होळीत तो आनंद वाटत नाही. त्यामुळे अभिनेत्रीने होळीमध्ये रंग खेळणं बंद केलं आहे.
चित्रपटांमध्ये मनसोक्त अभिनयाचे रंग उधळणार रणवीर खऱ्या आयुष्यात मात्र रंगापासून दूर राहतो.
अभिनेता रणबीर कपूरनेसुद्धा अनेक वर्षांपासून रंगपंचमी-होळी खेळलेली नाहीय.
अभिनेत्री तापसी पन्नूसुद्धा रंगापासून दूर राहणं पसंत करते.
बॉलिवूडचा फिटनेस फ्रिक अभिनेता टायगर श्रॉफचासुद्धा या यादीत समावेश आहे. या अभिनेत्याला रंगाची भीती वाटते त्यामुळे तो रंगपंचमी-होळीचा मनसोक्त आनंद घेत नाही.
साऊथ अभिनेत्री श्रुती हसनलासुद्धा होळी खेळणं पसंत नाहीय. त्यामुळे ती रंगापासून दूर असते.
अभिनेता सूरज पांचोलीसुद्धा रंगापासून दूर राहतो.