NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / सारा अली खान ते शाहिद कपूर, 'या' स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर

सारा अली खान ते शाहिद कपूर, 'या' स्टारकिड भावंडांच्या वयात आहे मोठं अंतर

बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या मुलांचीही बी-टाऊनमध्ये चर्चा होत असते. वाचा या स्टार्स मुलांच्या वयात किती अंतर आहे...

16

बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या मुलांचीही बी-टाऊनमध्ये चर्चा होत असते. सिनेसृष्टीत असे अनेक स्टार आहेत ज्यांना एकाहून जास्त मुलं आहेत. आज आम्ही तुम्हाला याच स्टार्स मुलांच्या वयामधील अंतर सांगणार आहोत.

26

आर्यन, सुहाना आणि अब्राम- शाहरुख खानला एकूण तीन मुलं आहेत. आर्यन खानचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ मध्ये झाला होता. तो २१ वर्षांचा आहे. तर २२ मे २००० रोजी सुहानाचा जन्म झाला. ती १९ वर्षांची आहे. यानंतर २०१३ मध्ये शाहरुखच्या तिसऱ्या मुलाचा अब्रामचा जन्म झाला. तो पाच वर्षांचा आहे. आर्यन आणि अब्राममध्ये तब्बल १६ वर्षांचं अंतर आहे तर सुहानापेक्षा अब्राम १४ वर्षांनी लहान आहे.

36

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर- बॉलिवूड अभिनेता शाहिद आणि ईशान सावत्र भावंडं असले तरी दोघांचा एकमेकांवर जीव आहे. शाहिद आपल्या छोट्या भावावर अतोनात प्रेम करतो. शाहिदचं वय ३८ वर्ष आहे तर ईशान २३ वर्षांचा आहे. दोघांच्या वयामधलं अंतर जवळपास १५ वर्षांचं आहे.

46

सारा, इब्राहिम आणि तैमुर- साराचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ मध्ये झाला. ती २४ वर्षांची आहे. तिचा छोटा भाऊ अब्राहिम १८ वर्षांचा आहे. सैफने अमृता सिंगशी घटस्फोट घेऊन २०१२ मध्ये करिना कपूरशी लग्न केलं. दोघांना २ वर्षांचा मुलगा तैमुर आहे. तैमुर आणि साराच्या वयात जवळपास २२ वर्षांचं अंतर आहे तर इब्राहिम आणि तैमुरमध्ये १६ वर्षांचं अंतर आहे.

56

अर्जुन, जान्हवी आणि खुशी कपूर- बॉलिवूड अभिनेता अर्जुन आणि अंशुला कपूर हे बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलं. मोना यांच्यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. अर्जुन आणि जान्हवी यांच्या वयात जवळपास ११ वर्षांचं अंतर आहे तर खुशी आणि अर्जुन यांच्या वयात १५ वर्षांचं अंतर आहे.

66

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट- महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण यांची मुलगी पूजा भट्ट. तर महेश आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांना आलिया ही मुलगी आहे. पूजाचं वय ४७ वर्ष आहे तर आलिया २६ वर्षांची आहे. दोघींच्या वयात २१ वर्षांचं अंतर आहे.

  • FIRST PUBLISHED :