अभिनेत्री करिना कपूरनं बाॅलिवूडमध्ये झीरो फिगरची संकल्पना आणली. आपलं आरोग्य, फिगर याबद्दल करिना कपूर नेहमीच जागरुक आहे. तिच्या फिटनेससासाठी ती काय करते वाचा
करिना जास्त महत्त्व देते ती योगाला. ती रोज पाॅवर योग, अष्टांग योग, सूर्यनमस्कार या गोष्टी करते. सोबत मेडिटेशनही करते.
शरीर तजेलदार दिसावं, लवचिकता वाढावी यासाठी करिना हाॅट योग करते.
तिच्या नेहमीच्या व्यायामात ती डान्सलाही तितकंच महत्त्व देते.
करिना जिममध्ये जाऊन कार्डिओ एक्झरसाईझही करते. ती जिमला अडीच तास देते.
करिना शाकाहारी आहे. ब्रेकफास्टला करिना सोया मिल्क, ब्रेड, चीज घेते. दुपारच्या जेवणात ती चपाती, डाळ, ग्रीन सॅलॅड आणि भाज्यांचं सूप घेते.
मधल्या वेळेत करिना प्रोटिन शेक आणि फळं खाते. रात्रीच्या जेवणात चपाती,डाळ आणि भाज्याचं सूप असतं.
करिना दिवसाला 6 ते 8 ग्लास उकळलेलं पाणी पिते. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर ती तीन-तीन तासांनी काही तरी खाणं पसंत करते.