साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.
तमन्ना भाटिया बॉलिवूड अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या बातम्या सतत ऐकायला मिळत असतात.
अशातच आता विजयने हे नातं कन्फर्म केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व सोनाक्षी सिन्हामुळे घडल्याचंही सांगितलं जात आहे.
सोनाक्षी सिंन्हा लवकरच विजय वर्मासोबत 'दहाड'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच दोघेही टीमसोबत एका इव्हेन्टमध्ये पोहोचले होते.
या इव्हेन्टदरम्यान गप्पा मारताना सोनाक्षीने विजयला तमन्नावरुन डिवचलं, तेव्हा अभिनेत्याला आपलं हसू आवरता आलं नाही. विजय अगदी लाजरं हास्य करताना दिसून आला.
विजयने नकारही दिला नाही आणि होकारही नाही मात्र अभिनेत्याचं हसणं सर्वकाही सांगून घेल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
नुकतंच तमन्ना आणि विजय डिनर डेटवर एकत्र दिसून आले होते. त्यामुळे यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे.