साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. 'बाहुबली' चित्रपटाच्या माध्यमातून ही अभिनेत्री जगभरात लोकप्रिय झाली आहे.
सध्या तमन्ना आपल्या आगामी 'बबली बाउन्सर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. यासाठी अभिनेत्री आपल्या टीमसोबत कपिल शर्मा शोमध्येसुद्धा सहभागी झाली होती.
तमन्ना भाटिया नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिची स्टाईल आणि लुक्स लक्ष वेधून घेत असतात.
नुकतंच पापाराझींनी अभिनेत्री अभिनेत्रीला एयरपोर्टवर आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.
यावेळी तमन्नाने हटके असा जम्पर परिधान केला होता. सोबतच हातात 'बरबेरी टोटे'ची बॅगही घेतली होती.
तमन्नाने कॅरी केलेली बॅग सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही बॅग फारच महागडी आहे.
या बॅगेवरुन लक्षात येतं की, साऊथ अभिनेत्रींची लाईफस्टाईल बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी रॉयल नाही.
तमन्नाने हातात घेतलेल्या या बॅगची किंमत तब्बल 90 हजार रुपये इतकी आहे.