साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे. एक तर, अभिनेता विजय वर्मासोबतची तिने केलेली 'लस्ट स्टोरीज' सीरिज आणि दुसरी कावाला गाण्यातील तिचा सुपरहॉट डान्स. जेलर सिनेमात पुन्हा एकदा तमन्न दिसणार आहे. थलायवा रजनिकांतसोबत ती या सिनेमात काम करत आहे. तिचं कावाला गाणं सध्या खूप चर्चेत आहे. तिने या सिनेमासाठी सर्वात जास्त फी घेतली आहे.
साउथ इंडस्ट्रिमध्ये थलायवा रजनिकांतची क्रेझ खूप जास्त आहे. त्याचा नवा सिनेमा जेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठं उत्साहाचं वातावरण आहे. हा सिनेमा 10 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी तमन्न कावाला गाण्यामुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच या सिनेमातील हुकूम गाणं प्रदर्शित झालं. तमन्नाने कालावामध्ये केलेला डान्स आणि तिच्या मूव्ह्स पाहून चाहते पुरते घायाळ झाले आहेत. तिच्या या गाण्यावर चाहते सोशल मीडियावर रिल्स बनवत आहेत.
तमन्नाला रजनिकांतसोबत जेलर चित्रपटातून स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. तिने या सिनेमासाठी तब्बल 3 कोटी रुपये घेतले आहेत. तर रजिनकांतने 150 कोटी घेतले आहेत. जॅकी श्रॉफने 75 लाख रुपये या सिनेमासाठी फी घेतली आहे.
33 वर्षीय तमन्ना भाटियाने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले की, 'रजनी सर खूप सुपरस्टार म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही खूप चांगले आहेत. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला एक धार्मिक पुस्तक भेट दिले, जे खूप खास आहे. त्यांनी आपली यावर ऑटोग्राफही खास मला दिली आहे.