NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'Taarak Mehta...'च्या जेठालालचा हा प्रसिद्ध डायलॉग सापडला होता वादात, पुन्हा न वापरण्याची मेकर्सची ताकिद

'Taarak Mehta...'च्या जेठालालचा हा प्रसिद्ध डायलॉग सापडला होता वादात, पुन्हा न वापरण्याची मेकर्सची ताकिद

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये जेठालाल' (Jethalal) ही भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनीच असे सांगितले की त्यांच्या एका डायलॉगमुळे मोठा गोंधळ झाला होता.

15

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये 'जेठालाल' ही सर्वात प्रसिद्ध मालिका आहे. ही भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीदरम्याना या भुमिकेविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी अशी माहिती दिली की 'जेठालाल'चा एक डायलॉग खूप चर्चेत आला होता, जो त्यांनी दयाबेनसाठी म्हटला होता. त्यानंतर मेकर्सनी त्यांना पुन्हा तो डायलॉग न बोलण्यास सांगितले होते. (फोटो सौजन्य-@taarakmehtakaooltahchashmahnfp/Instagram)

25

स्टँड अप कॉमेडियन सौरभ पंतबरोबर केलेल्या एका पॉडकास्टमध्ये दिलीप जोशी यांनी त्यांच्या या भुमिकेबाबत सांगितले. त्यांनी यावेळी अशी माहिती दिली की जेठालालचा एक डायलॉग त्यांनी स्वत: इंप्रोव्हाइज केला होता. ज्यामध्ये जेठालाल दयाला 'पागल औरत' असे संबोधतो. यावर अनेक मीम्स देखील बनले आहेत. मात्र या डायलॉगमुळे वाद देखील निर्माण झाला होता.

35

त्यांनी असे म्हटले की, 'जो पागल औरत असा डायलॉग होता तो मी इंप्रोव्हाइज केला होता. सेटवर अशी कोणतीतरी परिस्थिती होती की माझ्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले की ए पाल औरत. ज्याचा अर्थ असा होता की काहीही काय बोलते आहेस. मात्र त्यानंतर यावरून वूमेन लिबरेशन मुव्हमेंट झाली आणि मला सांगण्यात आले की पुन्हा हा डायलॉग म्हणू नका. (फोटो सौजन्य- instagram/@maakasamdilipjoshi)

45

त्यांनी असे म्हटले की हे वाक्य हलक्याफुलक्या पद्धतीने म्हटले होते मात्र काहींनी याचा चुकीचा अर्थ काढला. त्यांनी असे म्हटले की, 'कुणालाही कमी लेखणे असे काही नव्हते पण काही लोकांना ते आवडले नाही.'

55

त्याचप्रमाणे या संभाषणात ते म्हणाले की सध्या लेखकांवर खूप जास्त दबाव आहे. ज्यामुळे शोच्या गुणवत्तेवर प्रभाव पडत आहे. ते असे म्हणाले की, 'दर दिवशी लेखकांना काही नवीन विषय शोधावा लागत आहे. ती देखील माणसंच आहेत. मी हे मान्य करतो प्रत्येक एपिसोड त्या लेव्हलचा बनू शकत नाही जर दीर्घकाळासाठी तुम्ही रोज तेच करत असाल.'

  • FIRST PUBLISHED :