'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत काही दिवसांपूर्वीच नव्या तारक मेहतांची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेता सचिन श्रॉफ साकारत आहे.
सचिन श्रॉफ या मालिकेमुळे सतत चर्चेत असतात. आता अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत एक बातमी समोर आली आहे.
सचिन लवकरच दुसऱ्यांदा आहे. येत्या २५ फेब्रुवारीला अभिनेता बोहल्यावर चढत नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.
परंतु अनेकांना माहिती नसेल, सचिन श्रॉफ यापूर्वीसुद्धा लग्न बंधनात अडकला होता.
सचिन श्रॉफने टीव्हीची प्रसिद्ध मालिका 'कुमकुम' फेम अभिनेत्री जुही परमारसोबत लव्ह मॅरेज केलं होतं.
या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत होई. परंतु अचानक घटस्फोट घेत या दोघांनी सर्वांनाच धक्का दिला होता.
या दोघांनी रिलेशनशिपच्या अवघ्या ५ महिन्यात लग्नगाठ बांधली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर त्यांच्या नात्यामध्ये ताळमेळ बसत नव्हता.त्यांचं कोणत्याही गोष्टीत एकमत होत नसे.
असंही सांगितलं जातं की, लग्नाच्या ८ वर्षानंतरही जुहीला सचिनवर प्रेम जडलं नाही आणि घाईगडबडीत घेतलेल्या लग्नाचा निर्णय चुकला. त्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
जुही आणि सचिनला समायरा नावाची एक मुलगीसुद्धा आहे.