बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते.
स्वरा सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्वराने नुकतंच आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे.
अभिनेत्रीने गुपचूप लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परंतु स्वरा आणि फहादने फक्त कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे.
स्वराने मीडियासोबत संवाद साधताना पिक्चर अभी बाकी है... असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
स्वरा- अहमदने सांगितलं कि, 'लग्न अजून होणार आहे... आम्ही मार्चमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं फहादने स्पष्ट केलं आहे.
या दोघांच्या लव्हस्टोरीबाबत सांगायचं तर, दोघांची पहिली भेट शाहिनबागच्या आंदोलनात झाली होती.
फहादने याठिकाणी रोखठोख मत मांडत अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने आपण त्याच्या प्रेमात पडल्याचं स्वराने कबुल केलं आहे.