बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती नेहमीच आपलं मत व्यक्त करत असते.
अभिनेत्री सतत सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.आजही असंच काहीसं झालं आहे.
नुकतंच स्वरा भास्करने एका माध्यमाला मुलाखत देताना असं काही म्हटलं की, सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
स्वरा भास्करने शाहरुख खानवर आपली लव्ह लाईफ खराब करण्याचा आरोप लावला आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत स्वरा म्हणाली की, 'मी आदित्य चोप्रा आणि शाहरुख खानला आपली लव्ह लाईफ खराब करण्याला जबाबदार समजते'.
'कारण मी फार कमी वयात 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून मी राजच्या प्रेमात पडले होते'.
त्यामुळे माझ्या खऱ्या आयुष्यातही मला माझा राज भेटेल या प्रतीक्षेत मी अनेक वर्षे घालवली. परंतु वय वाढत गेलं आणि लक्षात आलं की, खऱ्या आयुष्यात राजसारखा कुणीच नाहीय'. असं मजेशीर उत्तर देत स्वराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सोबतच अभिनेत्रीने असंही म्हटलं, 'सिंगल राहणं फारच कठीण आहे. आणि जोडीदार शोधणं म्हणजे कचरा चाळण्यासारखं आहे'.