बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून प्रियकर रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सुश्मिता रोहमनसोबतचे अनेक रोमॅण्टिक फोटो बिंधास्त शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने रोहमनसोबतचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे.
नुकतेच सुश्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोघांचे समुद्रातील यॉटवरचे हॉट फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये दोघांचं एकमेकांसाठीचं प्रेम आणि बॉण्डिंग स्पष्ट दिसत होती. परफेक्ट कपलप्रमाणे दोघांनी पोज दिल्या.
रोहमन आणि सुष्मिता दोघंही एका रोमॅण्टिक जागी गेल्याचं या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांचं बॉण्डिंग जबरदस्त आहे.
फोटोत सुश्मिताने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून त्यावर पांढऱ्या रंगाचा हॉल्टर नेक श्रग घातला आहे. काळा गॉगल आणि मोकळ्या केसांमुळे ती मिस युनिर्व्हस का आहे हे पुन्हा एकदा कळतं.
रोहमनही काळ्या रंगाचे शॉर्ट्स आणि पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. या लुकमध्ये तो फार हँडसम दिसत होता. दोघंही एकमेकांच्या कंपनीत फार कॉन्फिडन्ट दिसत होते.
रोहमनसोबत सुश्मिता काही पहिल्यांदा फिरायला गेली नाही. याआधीही तिने अनेकदा रोहमनसोबतचे फिरतानाचे आणि डेटचे फोटो शेअर केले आहेत.
एवढंच नाही तर दोघं मिळून एकत्र वर्कआउट करतात. सुश्मितासोबत रोहमनही तिच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. रोहमनची केमिस्ट्री ही सुश्मिताच्या दोन्ही मुलींसोबतही फार खास आहे.