टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली.
14 जून 2020 रोजी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जगाचा निरोप घेतला. त्यानेही आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली टक्कर हिने 16 ऑक्टोबरला इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. वैशालीने ससुराल सिमर का आणि ये रिश्ता क्या कहलाता यांसारख्या अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलं होतं.
टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने 26 डिसेंबर 2019 रोजी रात्री उशिरा मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.
टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने 24 जानेवारी 2020 रोजी मुंबईतील तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 'दिल तो हैप्पी है जी' या मालिकेतून ती चर्चेत आली होती.
टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवालने 15 मे 2020 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी आत्महत्या केली.
जिया खानने वयाच्या 25 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 3 जून 2013 रोजी जुहू अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळली होती.
टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिने 26 मे 2020 रोजी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ती क्राइम पेट्रोलमध्ये काम करत होती.
प्रत्युषा बॅनर्जीने 2016 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली होती.