NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / ...म्हणून सुशांत सिंग राजपूतने सारासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला

...म्हणून सुशांत सिंग राजपूतने सारासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या. पण आई अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली.

18

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगची (Amrita Singh) मुलगी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) पुन्हा एकदा काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

28

विशेष म्हणजे सारा आणि सुशांतने 'केदारनाथ' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याच सिनेमातून साराने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या.

38

आई अमृता सिंगच्या सांगण्यावरून सारा सुशांतसोबत अंतर ठेवून राहू लागली. अखेर सुशांत आणि सारा आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले मात्र त्यांच्यातली कटुता काही कमी झाली नाही.

48

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

58

रिपोर्टनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत एक्ससोबत काम करायचे नाही. याशिवाय अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत सुशांत नात्यात असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेकदा एकत्र फिरताना आणि डिनरला जाताना पाहण्यात आलं आहे. तर साराचंही कार्तिक आर्यनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.

68

सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

78

सारा अली खान लवकरच इइम्तियाज अली दिग्दर्शित सिनेमात कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर वन' सिनेमात दिसणार आहे.

88

साराचे आतापर्यंत दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. फार कमी वेळात साराने आपलं स्थान सिनेसृष्टीत प्रस्थापित केलं. टॉप यंग अॅक्ट्रेसमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

  • FIRST PUBLISHED :