अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठानीची महत्त्वपूर्ण खुलासे करू शकतो. कारण 14 जूनला सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा तिथं सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या घरात तिथं उपस्थित होता.
सीबीआयनेदेखील सिद्धार्थ पिठानीची तब्बल 14 त्याची चौकशी केली.
आता या प्रकरणात सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होऊ इच्छितो आहे. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रूममेट असल्याचं सांगितलं जातं. तो सुशांतचा क्रिएटिव कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता.
रियाने सांगितल्यानुसार ती सुशांतच्या घरी राहायला जाण्याच्या आधीपासूनच सिद्धार्थ पिठानी सुशांतसह राहत होता.
रियाच्या अनेक इन्टाग्राम फोटो आणि व्हिडीओना तिने सिद्धार्थ पिठानीला क्रेडिट दिलं आहे.
एका रिपोर्टनुसार सुशांतची बहीण मीतूनेही सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीने तिला फोन करून सुशांत दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं होतं.