सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडी चौकशीही केली जाते आहे. रियाने सुशांतच्या पैशांनी परदेश दौरे केला होते. 2019 साली रिया सुशांतला घेऊन कुठेकुठे गेली होती, याची ट्रॅव्हल हिस्ट्री ईडीच्या हाती लागली आहे.
10 ते 11ऑगस्ट 2019, 26 ते 30 ऑगस्ट 2019, 21 ते 24 सप्टेंबर 2019 रिया महाराष्ट्र-गोवा रेंजमध्ये होती.
29 सप्टेंबर 2019 ला दिल्लीत होती. त्यानंतर रिया ने सुशांत आणि शोविकसह युरोप टूर केली. या परदेश दौऱ्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती ईडीच्या हाती लागली आहे.
3 ते 9 ऑक्टोबर 2019 रिया फ्रान्समध्ये सुशांत, शोविकसह होती.
9 ते 11 ऑक्टोबर 2019 रिया सुशांत, शौविकसह स्वित्झर्लंडमध्ये होती.
11 ऑक्टोबर 2019 तिघंही पुन्हा फ्रान्समध्ये परतले आणि त्याच दिवशी पुन्हा स्वित्झर्लंड गेले जिथं 12 ऑक्टोबर 2019 पर्यंत थांबले.
फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या या दौऱ्यामुळे रिया आणि शौविकवर ईडीचा संशय अधिकच वाढला आहे.
एका दिवसात त्यांनी फ्रान्स-स्वित्झर्लंडचा दोन वेळा दौरा का केला? रिया पुन्हा पुन्हा स्वित्झर्लंडला का जायची? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
13 ऑक्टोबर, 2019 नंतर रिया सुशांत आणि शोविकसह इटलीला गेली. तेव्हा सुशांतला मानसिक समस्या सुरू झाला.
इटलीमध्ये तिघंही 21 ऑक्टोबर, 2019 पर्यंत राहिले. जिथं सुशांतची प्रकृती खूपच बिघडली होती. रियानेदेखील तिथं सुशांतला एका पेटिंगमध्ये भूत दिसल्याचं सांगितलं.
21 ऑक्टोबर, 2019 ला रिया, सुशांत, शोविक ऑस्ट्रिया गेले तिथं 27 ऑक्टोबर, 2019 पर्यंत राहिले. सुशांतची बिघडलेली प्रकृती सुधारण्यासाठी रियाने तिथं तिनं त्याला 4 दिवसांचा डी-टॉक्सिफिकेशन कोर्सही दिला होता.
त्यानंतर सुशांतने मुंबईला जाण्याचा आग्रह केल्याने 28 ऑक्टोबर, 2019 ला पुन्हा मुंबईत आले.