NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sunny Deol: वडील धर्मेंद्रसारखाच रागीट आहे सनी देओल; 'या' 4 सुपरस्टार्ससोबत सेटवरच केलंय जोरदार भांडण

Sunny Deol: वडील धर्मेंद्रसारखाच रागीट आहे सनी देओल; 'या' 4 सुपरस्टार्ससोबत सेटवरच केलंय जोरदार भांडण

Sunny Deol When Furious With Co Star: कलाकारांमधील मैत्री आणि भांडण या दोन्ही गोष्टी बॉलिवूडमध्ये नवीन नाहीत. सनी देओलने आपल्या करिअरमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत पंगे घेतले आहेत.

15

कलाकारांमधील मैत्री आणि भांडण या दोन्ही गोष्टी बॉलिवूडमध्ये नवीन नाहीत. शाहरुख आणि सलमान खान यांच्यातील वाद बरेच दिवस सुरु होता.तर सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील भांडण आजही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, बॉलिवूडचा ही-मॅन म्हटल्या जाणार्‍या धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचाही या यादीत समावेश होतो.त्याकाळात या बापलेकांनीसुद्धा अनेक पंगे घेतले आहेत. आज आम्ही धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता सनी देओलबद्दल सांगणार आहोत.सनी देओलने आपल्या करिअरमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत पंगे घेतले आहेत.

25

या यादीत सर्वात आधी नाव येतं अक्षय कुमारच. सनी आणि अक्षयमध्ये चांगलंच वाजलं होतं. हे भांडण रवीना टंडनमुळे झालं होतं. मीडिया रिपोर्ट्सवर एकेकाळी अक्षय कुमार आणि रवीना टंडनला बॉलिवूडचं परफेक्ट कपल म्हटलं जायचं. मात्र, नंतर दोघांमध्ये ब्रेकअप झालं. 'जिद्दी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी देओल 1 दिवस शूटिंग करत होता. तेवढ्यात रवीना टंडन आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सनी देओलने याचे कारण विचारले असता रवीनाने सांगितले की, ब्रेकअपमुळे ती खूप दुःखी आहे. त्यानंतर सनी देओलने रवीना आणि अक्षय यांच्यात पॅचअप करण्यासाठी पुढाकार घेतला.पण अक्षयने सनीचं एक नाही ऐकलं तो काहीही ऐकून घेण्यास तयारच नव्हता. त्यादिवसापासून सनी आणि अक्षयमध्ये ३६ चा आकडा निर्माण झाला होता.

35

पडद्याशिवाय खऱ्या आयुष्यातही सनी देओल अनिल कपूरसोबत खूप हसताना आणि विनोद करताना दिसून आला आहे. हा किस्सा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला होता.असं म्हटलं जातं की, एका चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, ज्यामध्ये सनी देओल आणि अनिल कपूर फाईट सीन्स करत होते. शूटिंगदरम्यान अचानक सनीला राग आला. मग काय... त्याने रागाच्या भरात अनिलचा गळा खूप जोराने पकडला, अनिल कपूर यांना गुदमरायला लागलं. तेव्हा टीम मेंबर घाबरले. दिग्दर्शक पुन्हा पुन्हा कट्स सांगत होता, पण संतापलेल्या सनीचा स्वतःवर ताबा नव्हता. त्यावेळी क्रू मेम्बर्सनी येऊन अभिनेत्याला वाचवलं होतं.

45

सनी देओलचं भांडण बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबतही झालंआहे. 'डर' चित्रपटादरम्यान हे भांडण झालं होतं. हे भांडण इतकं वाढलं की, सनीने शाहरुखसोबत पुन्हा कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, चित्रपटादरम्यान सनी आणि शाहरुखमध्ये एक फाईट सीन शूट होणार होता. पण सनीला हा सीन मान्य नव्हता. सनी म्हणत होता की, चित्रपटात त्याची भूमिका एका कमांडोची आहे, मग सामान्य माणूस त्याला कसा मारु शकतो?यश चोप्रानी त्याला समजावलं पण सनी हा सीन मान्य करायला तयार नव्हता. या वादावादीदरम्यान रागाच्या भरात त्याने आपले दोन्ही हात खिशात घातले. त्याचा राग इतका होता की त्याच्या हातातून पॅन्टचे दोन्ही खिसे फाटले.

55

  • FIRST PUBLISHED :