'सुख म्हणजे काय असतं' फेम शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही सतत चर्चेत असते.
माधवी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
तिचं 'शालिनी' हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.
शालिनीनं म्हणजेच माधवीनं नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.
माधवीचं नवं साडीतलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. याशिवाय तिच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर होत आहे.
माधवीचं प्रत्येक फोटोशूट, ग्लॅमरस अंदाज, हटके स्टाईल ही प्रेक्षकांना नेहमीच भावताना दिसते.
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून माधवीला ओळखलं जातं.
माधवी निमकर अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे.