तब्बल 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरचं एक नवं पत्र समोर आलं आहे.
तत्पूर्वी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे फोटो समोर आल्याने खळबळ माजली होती. या फोटोंवरुन जॅकलीन आणि सुकेश एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं.
दरम्यान आता सुकेश चंद्रशेखरने चक्क तिहार रुंगातून जॅकलीनसाठी लव्हलेटर लिहलं आहे. या लव्ह लेटरमध्ये असलेल्या मजकुराची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
सुकेशने यामध्ये लिहलंय, ''माय बेबी, माय बोम्मा.. माय बेबी जॅकलीन तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा. हा वर्षातील तुझ्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. मला या गोष्टीचा अंदाज आहे. तुला या दिवसासाठी खूप प्रेम.
त्याने पुढे लिहलंय, ''मी तुझ्यात लपलेल्या त्या लहान मुलाला पाहण्यासाठी आतुर आहे, जो एग्ज फोडतो आणि त्यात मजेने कँडी मिक्स करतो'. तुझा हा निरागसपण मला आवडतो.
तू किती किती सुंदर आहेस हे तुला माहितेय का? बेबी या ग्रहावर तुझ्याइतकं सुंदर कुणीच नाही. आय लव्ह यू माय बेबी'.
तसेच सुकेशने लिहलंय, 'सध्या वाईट दिवस सुरु आहेत. पण हे दिवस सुद्धा लवकरच निघून जातील. तुझा पुढच्या वर्षीचा ईस्टर फारच खास असणार आहे. तुझा तो खास दिवस आणखीनच खास बनवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन'.
सुकेशने जॅकलीनसाठी लिहलेल्या या लव्ह्लेटरची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.