मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे.पण अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य मात्र फारसं लाईमलाईटमध्ये नसतं.
स्पृहा जोशी अशा काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना आपलं खाजगी आयुष्य ग्लॅमरपासून दूर ठेवायला आवडतं.
स्पृहा जोशीने वरद लघाटेसोबत लग्न केलं आहे.वरदने एक पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण सध्या तो मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
स्पृहा आणि वरदची लव्हस्टोरी फारच हटके आहे.या दोघांनी एका वृत्तपत्रासाठी कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम केलं आहे.मात्र पाहिल्याच भेटीत या दोघांचं खटकलं होत.
या दोघांमध्ये सतत खटके उडत असत.परंतु या दोघांना एकत्र एक प्रोजेक्ट देण्यात आला होता.ज्यामध्ये दोघांना सतत सोबत राहावं लागत असे.अशाप्रकारे सोबत काम करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
स्पृहा जोशी आणि वरद लघाटेने तब्बल 6 वर्षे एकमेकांना डेट केलं आहे. दीर्घकाळ नात्यात राहिल्यानंतर या दोघांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली होती.
स्पृहा आणि वरद एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात आणि सोबत सुखाचा संसार करत आहेत.