साऊथ सुपरस्टार धनुषने काल एक ट्विट करत सर्वांनाच धक्का दिला आहे. हे ट्विट त्याच्या आणि पत्नी ऐश्वर्याच्या बाबतीत होतं. हे दोघे तब्बल 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर आता घटस्फोट घेत आहेत. त्यांच्यामध्ये अचानक काय बिनसलं या विचाराने चाहते त्रस्त आहेत. त्यांनी अजूनही नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. तत्पूर्वी आपण त्यांच्या लव्हस्टोरीवर एक नजर टाकूया.
साऊथ सुपरस्टार धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीशी लग्न केलं होतं. या दोघांना साऊथमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक समजलं जात होतं. त्यांच्या या निर्णयावर चाहत्यांना अजून विश्वास ठेवणं कठीण आहे.
धनुष आणि ऐश्वर्या यांनी 18 नोव्हेंबर 2004 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच रंजक आहे.
धनुष आणि ऐश्वर्या यांची भेट एका चित्रपटगृहात झाली होती. यावेळी धनुष 'काढाल कोंडे' चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. तर ऐश्वर्यासुद्धा तेथे आली होती. त्यावेळी या दोघांची भेट घालून देण्यात आली होती.
यावेळी धनुष आपल्या 'आदुकलाम' चित्रपटामुळे चर्चेत होता. तर ऐश्वर्या रजनीकांत यांची लेक असल्याने तसेच ती स्वतः एक दिग्दर्शिका असल्याने चर्चेत असायची.
परंतु त्यांच्या पहिल्या भेटीत फक्त हाय हॅलो इतकंच झालं होतं. तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी फुलांचा बुके पाठवला होता. त्यांनतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या.
आणखी एक विशेष म्हणजे ऐश्वर्या धनुषच्या बहिणीची मैत्रीण होती. त्यामुळे त्यांची ओळख वाढतच गेली. त्याकाळची या दोघांच्या अफेयर्सच्या प्रचंड चर्चा सुरु होत्या.
त्यांनतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी १८ वर्षे एकत्र संसार केला आहे. या दोघांना दोन मुलेसुद्धा आहेत.